मान्सून महाराष्ट्राच्या सरहद्दीवर पोहोचला असला तरी जून महिन्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. (Monsoon in Maharashtra) वाऱ्याचा वेग कमी झाल्याचा हा परिणाम आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यावर्षी महाराष्ट्रात सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्यातील हवामानाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
अद्यापही राज्यातील काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसतच आहेत. मान्सून रेंगाळला असल्याचे बोलले जात आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विदर्भाला उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.
मान्सूनकडे डोळे लावून बसलेले शेतकरी आता त्रस्त झालेले आहेत. कारण धड पाऊसही येईना आणि धड उनही पडेना. मान्सून रेंगाळला असल्याने अधिकच निराशा झालेली आहे. विदर्भातील अनेक भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण महाराष्ट्रात होणाऱ्या पूर्वमौसमी पावसाचा देखील जोर कमी आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही तापमान चाळीशी पार आहे.
नागपुरात काल 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपुरात काल 46.4 तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांना येणारा संपूर्ण आठवडा उष्ण तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.





