शिरोळ नगरपरिषदेमार्फत पात्र 51 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले. या योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना अडीच लाखाचा निधी टप्याटप्याने मिळणार आहे. अशी माहिती शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिह माने पाटील यांनी दिली. शिरोळ शहरातील विविध विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हा चेअरमन यांच्या बिनविरोध निवडी केल्याबद्दल शिवाजी विकास सोसायटीचे अध्यक्ष उदय जगदाळे, उपाध्यक्ष दतात्र्यय कुंभार, दिनबंधू सोसायटी चे चेअरमन डी सी चव्हाण दिनदौलते चेअरमन आप्पासो काळे, निवृत्त कामगार चिमसो गावडे तसेच हरवलेले पैसे प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल नलवडे काका एस टी सेवेतुन निवृत्त झाल्याबद्दल सुशीला माने सापडलेले मंगळसूत्र परत केल्याबद्दल शिवाजी माने कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल अमृता पुजारी शाहू वाचनालयाचे अध्यक्ष अण्णासो माने गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील सर्व नगरसेवक पत्रकार विविध मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.