ताजी बातमी ऑनलाईन टीम
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करणारच अशी घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली. औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील या सभेसाठी उपस्थित राहीले. या सभेसाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. शिवसेनेचा ३७वा वर्धापनदिन यावेळी साजरा करण्यात आला.
नाव देण्याआधी या शहराचा सर्वांगीण विकास करणार
औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा मुद्या चर्चेत होता. यावर सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. या वेळी ते म्हणाले, “संभाजीनगर हे नाव देण्याचे वचन माझे वडील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहे आणि ते मी पूर्ण करणारच. पण त्याची सुरुवात म्हणून येथील विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज असे देण्याचा ठराव विधानसभेत केला आहे, त्याला दीड वर्षं झाली आहेत.” हा ठराव केंद्राकडे प्रलंबित राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देताना या शहराचा सर्वांगीण विकासही करणार असे ते म्हणाले.