Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी; आईचा विरह सहन न झाल्याने डॉक्टर मुलीची आत्महत्या

इचलकरंजी; आईचा विरह सहन न झाल्याने डॉक्टर मुलीची आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आळते ता.हातकणंगले येथील निलोफर शहाजहान मुल्लाणी(वय
२२) या वैद्यकिय क्षेत्राच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने राहत्या घरी ओढणीने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ता.८ सकाळी उघडकीस आली. अडिच महिन्यापुर्वी तीच्या आईचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला होता. तेंव्हापासुन ती आईच्या आठवणीने व्याकुळ होऊन मानसिक दडपणाखाली होती या तणावामुळे तीने स्वतःची जीवन यात्रा संपविली असावी अशी घटनास्थळी चर्चा होती. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.



बुधवारी सकाळी वडील दारात पाणी तापवत असताना निलोफर गॅसवर कुकर ठेऊन वरील खोलीत गेली होती. लहान मुलगीला वरील खोलीत निलोफरला बोलवायला पाठविले असता तीने ओढणीने गळफास लाऊन घेतल्याचे उघडकीस आले. दरम्यान डॉक्टरांना आणून तपासणी केली असता ती मयत झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील रियाज मुजावर यांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -