Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 10 जून रोजी सायं. 5 वा. कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 11 जून रोजी सकाळी 9 वा. कागल येथील जयसिंगराव तलावाच्या कॅनॉलचे पाणी पूजन. (स्थळ: कागल) राखीव. 6 वा. हळदवडे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ, उद्घाटन सोहळा व बांधकाम कामगारांना साहित्य व किटचे वाटप. (स्थळ: हळदवडे, ता. कागल) 7 वा. करंजीवणे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ. उद्घाटन सोहळा व बांधकाम कामगारांना साहित्य व किटचे वाटप. (स्थळ: करंजीवणे, ता. कागल)

रविवार दि. 12 जून रोजी सकाळी 9 वा. अभ्यागतांच्या भेटीगाठी. (स्थळ: कागल निवासस्थान) 10. 30 वा. धोंडीलालजी शिरगांवे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सोहळा व गौरव समारंभ. (स्थळ: श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी) 5 वा. भादवणवाडी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ. उद्घाटन सोहळा व बांधकाम कामगारांना साहित्य व किटचे वाटप. (स्थळ: भादवणवाडी, ता. आजरा) 6 वा. सोहाळे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ. उद्घाटन सोहळा व बांधकाम कामगारांना साहित्य व किटचे वाटप. (स्थळ: सोहाळे, ता. आजरा)

सोमवार दि. 13 जून रोजी सकाळी 9 वा. अभ्यागतांच्या भेटीगाठी. 10. 45 वा. कागल येथून के. डी. सी. सी. बँक कोल्हापूरकडे प्रयाण. 11 वा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक. (स्थळ: के. डी. सी. सी. बँक, कोल्हापूर) 12 वा. कोल्हापूर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक. (स्थळ: कोल्हापूर शासकीय विश्रामगृह) राखीव. 3 वा. संजय गांधी निराधार पेन्शनचे मंजूरीपत्र वाटप कार्यकर्त्यांची बैठक. (स्थळ: शाहू हॉल, कागल) 5 वा. अर्जुर्णी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ, उद्घाटन सोहळा व बांधकाम कामगारांना साहित्य व किटचे वाटप. (स्थळ: अर्जुणी, ता. कागल) 8. 45 वा. छत्रपती शाहू टर्मिनस, कोल्हापूर येथून मुंबईकडे रवाना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -