बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला.. त्यानंतर आता साऱ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे.. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं सांगितलं होतं.
कोरोना संकटामुळे गेली 2 वर्षे दहावीच्या परीक्षांना फाटा देण्यात आला होता. त्यानंतर यंदा ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवण्यात आला.. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला, नंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला, अशा अनेक संकटावर मात करीत अखेर ही परीक्षा झाली..
दहावीच्या परीक्षेसाठी तब्बल 16 लाख विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण आठवडाभरात दहावीचा निकाल जाहीर केला जातो.. त्यानुसार, येत्या 15 जून 2022 पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून समजली..
दहावीचा निकाल विद्यार्थी-पालकांना ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि आईच्या नावाची माहिती द्यावी लागेल.. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहायला मिळणार आहे.
असा पाहा दहावीचा निकाल
- सुरुवातीला mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर व आईचे नाव भरा.
- ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
- दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील वापरासाठी तो सेव्ह करुन ठेवा.
महत्त्वाच्या बाबी
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सीट नंबर आहेत.
- निकाल पाहण्यासाठी रोल नंबर व आईचं नाव आवश्यक
- रोल नंबर चुकल्यास, आईच्या नावानेही रिझल्ट चेक करता येणार, किंवा आईचं नाव चुकल्यास रोल नंबरनेही रिझल्ट पाहता येईल.
- महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या निकालाची वेबसाईट माहिती असावी.
गेल्या वर्षी दहावीचा निकाल कोरोनामुळे उशीरा म्हणजे, 16 जुलै रोजी जाहीर झाला होता. मात्र, यंदा 15 जूनपर्यंत हा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच याबाबतची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे..
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होते. हे लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने अकरावीसाठी प्रवेश अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. नोंदणीसह अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात झालीय. दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले..