कालच झालेले खासदार आता आम्ही कोल्हापूर रेल्वे व विमानतळा बद्दल केलेल्या कामांचे श्रेय घेत उद्या मीच केले म्हणतील असे टीका खासदार संजय मंडलिक यांनी राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केली.
कागल येथे दुधगंगा डाव्या कालव्याचे पाणी जयसिंगराव तलावात सोडण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थितीत होते.
खासदार मंडलिक म्हणाले, महाभारतात शकुनीमामा जसा सोंगाट्या टाकतो तसा कुटीलपणा करीत राज्यसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. मते बाद करणे, मतमोजणी लांबवणे वगैरे प्रकार केले आहेत. तरी देखील नुतन खासदार धनजंय महाडिक यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे खासदार संजय मंडलिक म्हणाले.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेना भेटुन कोल्हापूर विमानतळाबद्दल काही मागण्या केल्या. त्यानुसार काम सुरू आहे. विमानतळाच्या नाइट लॅण्डिंग रनवे क्षेत्र वाढवीणे साठी ६५ एकर भुसंपादनीचे काम सुरू आहे. शासनाने २५० कोटीचा निधी मंजुर केला आहे. विमान कंपनीबद्दल चर्चा झाली आहे. रेल्वे गाड्यांना ही मंजुरी मिळणार आहे. या शिवाय विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. हे सांगण्याची गरज एवढीच की आता झालेले खासदार सवयी प्रमाणे मी केले मी केले म्हणतील. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वच पाटबंधारे प्रकल्प पुर्ण केले जातील.