Monday, February 24, 2025
Homeतंत्रज्ञानझक्कास ऑफर! आता 4 रुपये पाठवा आणि मिळवा 100 कॅशबॅक, करा फक्त...

झक्कास ऑफर! आता 4 रुपये पाठवा आणि मिळवा 100 कॅशबॅक, करा फक्त ‘हे’ काम..

सध्याच्या डिजिटल युगात आपल्याला पैसे पाठवायचे म्हटले तरी काही क्षणात आपण पाठवू शकतो. जग बदलत चाललं आहे आणि आपणही नवीन तंत्रज्ञान स्वीकारत चाललो आहे. देशात बरेच UPI Apps असताना भारताची प्रमुख डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सेवा देणाऱ्या पेटीएम वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने म्हणजेच पेटीएम (Paytm) ने ग्राहकांसाठी नेहमीप्रमाणेच या वेळेस एक भन्नाट ऑफर आणली आहे.

4 का 100 कॅशबॅक ऑफर काय आहे..?

पेटीएमने सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पेटीएम टी-20 क्रिकेट मालिकेच्या कालावधीत ही ऑफर चालू असणार असं सांगितलं आहे. म्हणून जोपर्यंत ही मालिका चालू आहे, तोपर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर यूपीआय मनी ट्रान्सफरवर मिळणार आहे. यापूर्वीही आणलेली ही ऑफर पुन्हा देण्याची घोषणा केली आहे. पेटीएम ने याबाबत अधिकृत ट्विट करून देखील सांगितलं आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T-20 मालिका सुरू झाली असून ती 19 जून 2022 पर्यंत चालू असणार आहे. Paytm ने फेब्रुवारी 2022 मध्ये भारत-वेस्ट इंडीज मालिकेदरम्यानही अशी खास कॅशबॅक ऑफर आणली होती. भारतात पेटीएम कंपनी यूपीआय ऑनलाईन मनी ट्रान्सफरसाठी (UPI Online Money Transfer) साठी पेटीएम ही करोडो ग्राहकांच्या पसंतीची झाली आहे. ग्राहकांनी फक्त हे व्यवहार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या दिवशी करावे लागणार आहे.

ऑफरबद्दल अधिक माहीती अशी की, पेटीएम यूपीआयचा ग्राहकांनी वापर केला आणि कमीत कमी 4 रुपये ट्रान्सफर केले की ग्राहकांना 100 रुपयांचा सुरक्षित कॅशबॅक मिळणार आहे, असं पेटीएम कंपनीने सांगितले आहे. या आकर्षक ऑफरचा जर तुम्हालाही लाभ घ्यायचा असेल तर आणि तुमच्याकडे पेटीएम ॲप नसेल तर ते तुम्ही गुगल प्लेस्टोअरमधून किंवा ॲप स्टोअरवरून पेटीएम डाऊनलोड करून पेटीएम युपीआयसाठी साईन अप करू शकतात.

पेटीएम युपीआय सर्व्हीसचा जर यूजरला वापर करायचा असल्यास ते काही मिनिटांतच आपले बँक खाते लिंक करू शकतात. यामध्ये त्यांना थेट आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पेमेंट करणे सोपे जाते. तसेच ते लिंक्ड खात्यावरील रक्कम मोफत तपासू शकतात. कोणताही युपीआय क्यूआर कोड स्कॅन करून व्यवहार करू शकतात. याशिवाय सध्याच्या युजर रेफरल प्रोग्रामच्या माध्यमातून 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकू शकतात. यासाठी त्यांना आपले मित्र आणि कुटुंबियांना युपीआय मनी ट्रान्सफरसाठी पेटीएमचा वापर करण्यासाठी आमंत्रित करावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -