राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेले पियुष गोयल, अनिल बोंडे व धनंजय महाडिक यांच्या विजयाचा जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी करून साखर व पेढे वाटून आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तिन्ही उमेदवारांनी यश मिळवत आपल्या विजयाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. उत्तम नियोजनाने विजय खेचून आणण्याची ताकद काय असते हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात भाजपाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, संघटक सरचिटणीस दीपक माने, गटनेते विनायक सिंहासने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते