Saturday, July 26, 2025
Homeब्रेकिंगसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका! रोजच्या वापरातील दूध देखील आता महागणार

सामान्यांना पुन्हा महागाईचा फटका! रोजच्या वापरातील दूध देखील आता महागणार

रोजच्या आयुष्यातले कमाई आणि खर्चाचे गणित मांडता मांडता सामान्य जनतेची त्रेधातिरपीट उडत असते. रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची वाढू लागली आहे. घरापासून काम धंद्यांना जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची लागणाऱ्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. घरात लागणारे सिलेंडर स्वयंपाकात लागणारे अन्नधान्य वस्तू देखील आपल्या किंमतीच्या नवनवीन सीमा आखत आहेत. यातच नवीन खबर पसरू लागली आहे की आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात दुधाचे दर वाढवू शकतात. दूध हे रोजच्या जीवनातली अत्यावश्यक गोष्ट आहे. घरातल्या लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकालाच दुधाची गरज पडते. आता हे दूध महागले तर रोजच्या आयुष्यात अजून किती काटकसर करायची हा मोठा प्रश्न सामान्यांचे समोर उभा ठाकला आहे.

वाढत्या उष्णतेमुळे दुधावर परिणाम झाल्याचे तज्ञ मंडळी सांगतात. त्यातच पशुखाद्य व स्कीम् मिल्क पावडर यांचे दर देखील वाढत चालले आहेत. स्किम्ड मिल्क पावडर च्या किमतीत इयर टू इयर 26.3 टक्के आणि जून महिन्यात महिना दर महिना 3 टक्के वाढ झाली आहे. एकंदरीतच या सर्वाचा परिणाम दुधाच्या दरवाढीची होतो. दुधाची दरवाढ झाली की आपोआपच दुधापासून तयार होणाऱ्या इतर खाद्यपदार्थांवर देखील त्याचा राम दिसून येतो. दही, तूप, पनीर, चीज अशा खाद्य पदार्थांच्या मोठमोठ्या कंपन्या स्थापित झाले आहे. दूध महागल्यामुळे त्यांनी सुद्धा या सर्व पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढती मागणी व उत्पादनात घट हे सुद्धा दुधाचा वाढत्या किमतीचे त्याचे कारण दिसून येते. मागच्या काही वर्षांमध्ये भारतात हॉटेल्स रेस्टॉरंट यांची चलती मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामुळे हॉटेल्स मध्ये देखील दुधाची मागणी वाढली आहे. तसेच दूध उत्पादकांना परदेशातून मिळणार संधी खुणावत आहे. त्यामुळे निर्यातीचा फटका भारतातील दूध पुरवठ्यावर जाणवून येईल.

अखिल भारतीय पातळीवर जून मध्ये दुधाचे दर 5.8 टक्क्यांनी वाढले होते तर आता नुसत्या दक्षिण भारतात दुधाचे दर 3.4 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. या सर्वांचा फटका हात हे सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असताना मिळकत मात्र त्या प्रमाणात होत नसल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. त्यामुळे सरकारने आता हो ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -