Monday, February 24, 2025
Homeजरा हटकेजबरदस्त इंटिमेट सीन्स देऊनही मोठ्या पडद्यावरून गायब झाल्या 'या' अभिनेत्री

जबरदस्त इंटिमेट सीन्स देऊनही मोठ्या पडद्यावरून गायब झाल्या ‘या’ अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अभिनेता-अभिनेत्री म्हणून काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी हजारो लोक मुंबईत (Mumbai) येतात. त्यातील काहींना यश मिळते तर काहींना संधी मिळूनही यश मिळत नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बोल्डनेस आणि हॉटनेसने केली. तरी देखील त्या जास्त काळ इंडस्ट्रीत टिकू शकल्या नाहीत. यातील काही अभिनेत्रींचे लग्न झाले आहे, तर कोणी दुसरे काम करत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये जबरदस्त एन्ट्री केली होती. मात्र त्यांचे बॉलिवूड करिअर जास्त काळ टिकले नाही. या अभिनेत्री इंडस्ट्रीमधू जणू गायब झाल्या आहेत.

तनुश्री दत्ता
MeToo मोहिमेमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिची हॉट अभिनेत्रींमध्ये गणना होते. 2005 साली आलेल्या ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटात इमरान हाश्मीसोबत रोमान्स करणाऱ्या तनुश्री दत्ताने तिच्या पहिल्याच चित्रपटात बोल्ड सीन्स दिले होते. मात्र तिचे हे बोल्डनेस चमत्कार दाखवू शकला नाही. 2010 नंतर तनुश्री चित्रपटसृष्टीतून गायब झाली.

उदिता गोस्वामी (Udita Goswami)
आपल्या बोल्ड अभिनयाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारी अभिनेत्री उदिता हिने 2003 साली ‘पाप’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर ती एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली, तिने पुढच्या काही चित्रपटांमध्ये असेच सीन्स दिले. 2012 पर्यंत बॉलिवूडमध्ये सक्रिय राहिल्यानंतर तीने लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला.

मल्लिका शेरावत
एक वेळ अशी होती की बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावत हिची जादू चाहत्यांवर होती. हॉलिवूडमध्ये आपल्या बोल्डनेसमुळे आग लागणाऱ्या मल्लिकाने ‘मर्डर’ चित्रपटात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तरीही तिला पाहिजे तितकं यश बॉलिवूडमध्ये मिळालं
नाही. सध्या ती परदेशात लाइफ एन्जॉय करत आहे.

सेलिना जेटली
आपल्या किलर लूकने बॉलिवूड चित्रपटांमध्ये हॉटनेस वाढवणारी अभिनेत्री सेलिना जेटलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिला प्रसिद्धी मिळाली पण तिची जादू फार काळ टिकू शकली नाही. सध्या ती पती आणि मुलांसह परदेशात आनंदी जीवन जगत आहे.

नेहा धुपिया
अभिनेत्री नेहा धुपियानेही बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टक्कर दिली. नेहाने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले, ज्यामध्ये तिने खूप बोल्ड सीन्स दिले आहे. मात्र, नेहाचा एकही चित्रपट हिट होऊ शकला नाही. सध्या ती वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -