सांगली शहरातील कोल्हापूर रोड, आकाशवाणी शेजारी कमते किराणा स्टोअर्सला शॉर्टसर्किटने काल, मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास आग लागली. या आगीत किराणा स्टोअर्सचे सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, सांगली कोल्हापूर रोड कमते किराणा स्टोअर्स दुकान आहे. या दुकानाला काल, रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. यात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. महापालिका अग्निशमन दलाने एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.