Friday, March 20, 2026
Homeब्रेकिंगअयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार, आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा

अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार, आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा

ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे अयोध्येत पोहोचले आहे. शिवसैनिकांनी त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयार केली आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सगळ्यात आधी इस्कॉन मंदिराला भेट दिली. त्यानंतर हॉटेल पंचशीलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही अयोध्येत राजकारण करण्यासाठी आलो नसून तिर्थयात्रेसाठी आल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले.


आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेश सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार असल्याचा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे थोड्याच वेळात श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते लक्ष्मण किल्ला येथे भेट देतील. सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर आरती करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईकडे प्रस्थान करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -