Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानगुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ दोन लोकप्रिय सेवा होणार बंद

गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ दोन लोकप्रिय सेवा होणार बंद

मागच्या काही दिवसांपासून गुगल एकामागून एक आपल्या युझर्सना काही आकर्षक फिचर भेट म्हणून देत आहे. गुगल mapsच्या माध्यमातून गुगलने गेल्या दोन महिन्यांत तीन ते चार फीचर्स युझर्सना दिले आहेत. असं असताना आता गुगल एक सेवा बंद करणार आहे. गुगल आपली इन्स्टंट मेसेजिंग सेवा गुगल टॉक हँगआउट बंद करणार आहे. यासंदर्भात अँड्राइड पोलीस’च्या एका रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे. . 2005 मध्ये लाँच करण्यात आलेल्या ‘जी टॉक’चं काम गुगलने मागील काही दिवसांपासून बंद केलं आहे. युजर्सनी गुगल हँगआउटवरून शिफ्ट व्हावं, असा सल्ला 2017 साली दिला होता.

‘जी टॉक’ काम हे Pidgim आणि Gajim सारख्या थर्ड पार्टीकडून चालवलं जात होतं. मात्र आता आजपासून म्हणजेच 16 जून 2022 पासून ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.गुगलने GoogleTalks ही सेवा 2005मध्ये लाँच करून त्याकाळच्या सर्वात मोठ्या स्पर्धकांना टक्कर दिली होती. स्काइप (Skype) आणि एमएसएनशी यांच्याशी GoogleTalksने केलेली स्पर्धा अद्यापही सर्वांच्या लक्षात आहे. 2020 मध्ये गुगल हँगआउटला चॅटच्या रूपात आणून या सेवेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. मात्र युझर्सचा चांगला प्रतिसाद याला मिळाला नाही.

आता गुगल टॉक बंद केलं जाणार असल्याची घोषणा गुगल सपोर्ट पेजवर करण्यात आली आहे. १६ जूननंतर जो कोणी ही सेवा जॉईन इन करण्याचा प्रयत्न करेल त्यांना तिथं एरर दिसू शकतं. फक्त गूगलच नाही तर मायक्रोसॉफ्ट देखील आपली एक सेवा बंद करणार आहे. मायक्रोसॉफ्टचा लोकप्रिय असलेला वेब ब्राऊझर ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ देखील बंद होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -