Tuesday, December 24, 2024
Homeनोकरीराज्य पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना PSI होण्याची सुवर्णसंधी!

राज्य पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना PSI होण्याची सुवर्णसंधी!

महाराष्ट्र राज्य पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पीएसआय (PSI) होण्याची सुवर्णसंधी आहे. जवळपास 250 पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी येत्या 30 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्य पोलिस दलामध्ये कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक आणि पोलिस शिपाई यांना पीएसआय होण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांनी या परीक्षेच्या तयारीला लागावे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी https://mpsc.gov.in/

या वेबसाईटला भेट द्यावी.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातर्फे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरु झाली आहे. 29 जून 2022 ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. पीएसआय पदासाठी होणारी परीक्षा राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या 6 केंद्रावर परीक्षा होणार आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज दाखल करतानाच यापैकी एका ठिकाणाची निवड करायची आहे.

या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा फी ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. जिल्हा केंद्र बदलीबाबत विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नसल्याने अर्ज दाखल करताना उमेदवारांना आपल्या सोयीचे ठिकाण निवडावे लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असणार आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे असणार आहे. मुख्य परीक्षा वस्तूनिष्ठ प्रश्नांवर आधारित 300 गुणांची असेल. शारीरिक चाचणीसाठी 100 गुण असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -