Tuesday, December 24, 2024
HomeसांगलीSangli: दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा, दोघांवर गुन्हा दाखल

Sangli: दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा, दोघांवर गुन्हा दाखल

मुचंडी (ता. जत) येथे बारमध्ये दारूच्या नशेत धार्मिक व देशविरोधी घोषणा दिल्याने केल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे मारामारीत रुपांतर झाले. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे. मंगळवार दि. १४ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी हाजीमलंग नबीसाहब नदाफ (रा. मुचंडी, ता. जत) व राजकुमार महादेव कोळी (रा. मुचंडी) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

राजकुमार कोळी, हाजीमलंग नदाफ यांच्यासह पाच ते जण मुचंडी येथील एका बारमध्ये मद्यप्राशन करीत बस टोते पर्याटी राजकुमार हा मोबाईल बघत होता. मोबाइलवरील पोस्ट पाहून त्याने धार्मिक घोषणा दिल्या याचवेळी हाजीमलंग नदाफ यानेही दारूच्या नशेत देशविरोधी घोषणाबाजी केली. त्यावरून तेथे एकच खळबळ उडाली. याचा फिर्यादी राजकुमार याने नदाफ याला जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. रात्री उशिरा फिर्यादी राजकुमार कोळी यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी दुपारी पोलिसांनी हाजीमलंग नदाफ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हा प्रकार दारूच्या नशेत व चेष्टेत घडला होता. यातून आपल्याला मारहाण झाल्याची फिर्याद हाजीमलंग नबीसाहब नदाफ याने जत पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार राजकुमार महादेव कोळी (रा. मुचंडी, ता. जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महेश मोहिते करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -