बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. सारा चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईलमुळेही नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर (Social Media) अँक्टिव्ह राहणारी सारा आपल्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटोज आणि व्हिडीओ शेअर (Sara Ali Khan Video) करत असते. अशातच सारा गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर होती तिथून देखील तिने कधी बिकिनीमध्ये तर कधी पूलमध्ये मस्ती करतानाचे जबरदस्त फोटो शेअर केले होते. तिचा हे फोटो खूप व्हायरल झाले होते. अशात साराने पुन्हा एकदा जबरदस्त फोटोशूट (Sara Ali Khan Latest PhotoShoot) केले आहे. हॉट असे हे फोटो चाहत्यांना घायाळ करणारे ठरत आहे. या फोटोमधील साराचा लूक अतिशय हॉट आहे. साराच्या या फोटोंनी इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे.
सारा अली खानने पुन्हा एकदा एक अतिशय बोल्ड फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. साराच्या या ड्रेसमधला लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. तिचा हा सिझलिंग लूक पाहून अनेक लोक म्हणत आहेत की, सारा पहिल्यांदाच अशा स्टाईलमध्ये दिसली आहे. सारा अली खानचे हे बोल्ड फोटोशूट फॅन्सच्या हृदयाचे ठोके चुकवत आहेत. या थाई स्लीट या आउटफिटमध्ये सारा अप्रतिम दिसत आहे. सोशल मीडियावर तिची अशी स्टाईल क्वचितच पाहायला मिळते.
साराच्या या गाऊनमध्ये पांढऱ्या रंगाची पट्टीही दिसत आहे. यासह ट्रान्सपरंट स्ट्रीप साराला अधिक हॉट बनवत आहे. साराच्या गाऊन बाजूने थाई-हाय स्लिट आहे. साराच्या फोटोशूटवर चाहत्यांचे अनेक कमेंट्स येत आहेत. यासह अनेक सेलिब्रिटीही या फोटोंवर तिची जोरदार प्रशंसा करताना दिसत आहेत. साराच्या या फोटोवर प्रियांका चोप्राने देखील कमेंट केली आहे. यासह तिची मैत्रिण अनन्या पांडेनेही तिच्या फोटोल लाईक करत कमेंट केली आहे.








