साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केलीय. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा केला आहे. जेलर’ या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्याशी हातमिळवणी केली आहे. शुक्रवारी, निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून रजनीकांतच्या सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
‘जेलर’चे पोस्टर रिलीज
पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला चाकू दिसत आहे. जो वरील साखळीला लटकलेला आहे. या पार्श्वभूमीत एक जुना कारखाना दिसतो. हे पोस्टर तामिळ आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात आले आहे. केवळ दक्षिणेतीलच नाही तर रजनीकांतच्या नॉर्थ साईडच्या चाहत्यांनाही हा चित्रपट पाहता येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये कन्नड अभिनेता शिवराजकुमारही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
JAILER या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सन पिक्चर्स सांभाळणार आहे. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण एकाच ठिकाणी होणार का? असे चाहते विचारत आहेत. नेल्सन दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट ‘बीस्ट’ होता जो एका मॉलमध्ये शूट झाला होता. एका चाहत्याने विचारले, “या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण जेलमध्ये होणार का?” आणखी एका चाहत्याने लिहिले, “नेल्सनने आणखी एक मोठे काम हाती घेतले आहे. तो एकाच लोकेशनवर शूट करेल. म्हणजे चित्रपटाचा मोठा भाग एकाच ठिकाणी शूट केला जाईल. जेलरमध्ये तुम्हाला एक मजबूत खलनायक लढताना दिसेल.”