Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंगअग्निपथ योजनेवर सरकारचा मोठा निर्णय!

अग्निपथ योजनेवर सरकारचा मोठा निर्णय!

केंद्र सरकारने लागू केलेली लष्करात भरतीची नवी योजना अग्निपथवरून (Agneepath Yojana) देशभरात सध्या गोंधळ सुरू आहे. या योजनेच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. पंरतु या दरम्यानच आता गृह मंत्रालयाने या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे.

गृह मंत्रालयाने अग्निवीर म्हणून सेवा पूर्ण केलेल्यांसाठी कमाल वयोमर्यादेतही सवलत जाहीर केली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिली जाईल. तर अग्निपथ योजनेंतर्गत भरती होणाऱ्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने तिन्ही दलांमध्ये भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली होती. सैन्यात अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची चार वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतरच गृहमंत्री अमित शहा यांनी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे.

काय आहे अग्निपथ योजना ?
सैन्यात सेवा बजावण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकराने अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सैन्यात भारती होण्यासाठी किमान वय वय 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी पात्रता सीनियर सेकंडरी म्हणजेच 12 वी उत्तरीर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेत भरती होण्यासाठी पूर्वीप्रमाणेच शारीरिक चाचणी घेतली जाईल. या योजनेचा सेवा कालावधी 4 वर्षे असेल आणि प्रशिक्षण कालावधी 6 महिने असेल. या योजनेअंतर्गत तीन्ही सुरक्षा दलांमध्ये दरवर्षी 50 हजार जवानांची भरती करण्यात येईल.
किती मिळेल वेतन?
पहिल्या वर्षात एकूण 30 हजार रुपये वेतन मिळेल. त्यात महिन्याला 9 हजार रुपायांची कपात होऊन 21 हजार रुपये हातात येतील. दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये वेतन मिळेल. त्यात कपात 10000 रुपयांची कपात होईल आणि महिन्याला 23 हजार रुपये हातात येतील. तिसर्याप वर्षी 36 हजार रुपये वेतन मिळेल, त्यात 11 हजारांची कपात होऊन महिन्याला 25 हजार रुपये मिळतील. तर चौथ्या वर्षी एकूण पगार 40 हजार रुपये मिळेल आणि त्यात 12 हजार रुपयांची कपात होऊन 28000 हजार रुपये मिळतील.

सेवानिवृत्तीनंतर काय?
या योजनेत 4 वर्षांच्या सेवा कालावधीनंतर सेवानिवृत्तीवर 11 लाख 71 हजार रुपये सेवा निधी पॅकेज म्हणून दिले जातील. 4 वर्षांच्या सेवा कालावधीनंतर पात्रता आणि निकषानुसार 25 टक्के जवानांना सैन्यात कायमस्वरुपी नियुक्ती दिली जाईल आणि उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना खाजगी कंपन्यांत नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल. तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी किमान व्याज दराने नॉन सिक्योर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -