Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंग"नरेंद्र मोदी स्वतः पद सोडतील आणि 'ही' व्यक्ती पंतप्रधान होईल"; भविष्यवाणी

“नरेंद्र मोदी स्वतः पद सोडतील आणि ‘ही’ व्यक्ती पंतप्रधान होईल”; भविष्यवाणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अलीकडेच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचे निकाल हाती आले. यापैकी चार राज्यांत भाजपने प्रचंड मोठे यश मिळवल्याचे पाहायला मिळाले. या चार राज्यांत भाजपने सत्ता कायम राहिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रगतीचा आलेख उंचावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सोडतील आणि त्यांच्या जागी भाजपची प्रमुख व्यक्ती त्या पदावर बसेल. ती व्यक्ती आणि पंतप्रधान मोदी कधी पद सोडतील, यांसारख्या मुद्द्यांवर भाकित वर्तवण्यात आले आहे.



उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल (modi) भविष्यवाणी केली आहे. राष्ट्रवादाच्या नावावर पंतप्रधान मोदी स्वत: पंतप्रधानपद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असे सूचक वक्तव्य महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केले आहे. महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केल्यास १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. १२ वर्ष हे पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील, असे महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -