ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंजाबचा गायक सिद्ध मुसेवाला यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा राजस्थानमधील बिश्नोई गँगचे नाव चर्चेत आले आहे. मुसेवाला खूनप्रकरणात सूत्रधार असलेला आरोपी सौरव कांबळे उर्फ महाकाल याने महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, बिश्नोई गँगच्या टार्गेटवर फक्त बॉलीवूड अभिनेता सलमान खानच नाही तर, फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहरही आहे. महाकालने केलेल्या या खुलाशामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
करण जोहरकडून ५ कोटींची खंडणी उकळण्याचा डाव पोलिस चौकशीदरम्यान सौरव कांबळे याने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान व्यतिरिक्त चित्रपट निर्माता करण जोहरचेही नाव बिश्नोई गँगच्या बॉलिवूडमधील हिटलिस्टमध्ये असल्याचे त्याने सांगितले. करण जोहरला धमकावून त्याच्याकडून ५ कोटी रुपये उकळण्याची बिश्नोई गँगचा डाव असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान महाकालने हा खुलासा केला आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी सौरव महाकालला सिद्ध मुसेवाला हत्याकांड आणि सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकाल हा शूटर संतोष जाधवचा साथीदार असून, गायक सिद्ध मुसेवाला खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे.
Karan Johar Target : सलमाननंतर आता करण जोहर बिश्नोई गँगच्या टार्गेटवर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -