ताजी बातमी ऑनलाईन टीम
शेअर बाजाराला वाकुल्या दाखवणा-या क्रिप्टो क्रेझेंचे नशीब ही फार काही जोरावर निघाले नाही. शेअर बाजारात(Share Market) गेल्या अनेक दिवसांपासून पडझडीचे (Crash) सत्र सुरु आहे. गुंतवणुकदारांचे पानीपत झाले आहे. झटपट श्रीमंतीसाठी अनेक तरुण क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीसाठी पुढे आले होते. त्यात सरकारने कर लावल्याने लवकरच क्रिप्टो करन्सीला ही राजाश्रयाच्या अफवा पसरल्या होत्या. पण सर्वच हवेतल्या गप्पा निघाल्या.
शेअर बाजारात गुंतवणुकदारांच्या गुंतवणुकीवर पार नुकसानीचा फेरा फिरला. गुंतवणुकदारांचे 18 लाख कोटी रुपये बुडाले. या पडझडीत क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकादारांचा ही समावेश आहे. त्यांचे ही 22 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. जवळपास 7 महिन्यात सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉईनची(Bitcoin) व्यापारात लागोलाग पिछेहाट सुरुच आहे. बिटकॉईनची सध्या 65 टक्क्यांनी पडझड झाली
आहे.