Saturday, August 2, 2025
Homeसांगलीमिरजेतील पायलटची नोएडाच्या महिलेकडून ५९ लाखांची फसवणूक

मिरजेतील पायलटची नोएडाच्या महिलेकडून ५९ लाखांची फसवणूक

नवऱ्याशी घटस्फोट(Divorce) घेऊन लग्न करण्याचे वचन देत नोएडाच्या एका महिलेने मिरजेतील पायलटला ५८ लाख ९२ हजार रुपयांना ! (९८ हजार २०१ अमेरिकन डॉलर) गंडा घातला. पैसे परत मागितले असता आईकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. याबाबत मिरजेतील crin महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी कि, आतिष शिंगे हे पायलट आहेत. त्यांचा उत्तर प्रदेशातील हना खान हिच्याशी परिचय झाला. माझे लग्न झालेले आहे. त्यामुळे मी पतीशी घटस्फोट(Divorce) घेऊन लग्न करेन, पण मला पायलट व्हायचे आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे, असे म्हणत आरोपी महिलेने पायलट आतिष शिंगे यांच्याकडे पैशांची मागणी केली.

दरम्यानच्या काळात महिलेने पायलट होण्यासाठी शिंगे यांच्याकडून ५८ लाख ९२ हजार रुपये (९८ हजार २०१ अमेरिकन डॉलर) घेतले. मुंबई, मिरज व मंगळुरु अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम घेतली. यावेळी आरोपी महिलेने रकमेची परतफेड पायलट झाल्यावर करते असे सांगितले. मात्र, पैसे परत मिळत नाहीत व लग्नही करत नाही असे लक्षात येताच शिंगे यांनी पैशाची मागणी केली. ही महिला गेली सहा वर्षे शिंगे यांच्या संपर्कात होती. यावेळी जमिनीची विक्री करून देते, अथवा जमीन नावे करुन देते असे सांगत आरोपी महिलेने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सातत्याने पैशाची मागणी करताना वडिलांचे १२ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे. ते आल्यावर देते असे सांगून वारंवार फसवणूक करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -