विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याती उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा झाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोमवारी सायंकाळपासून पक्षाच्या संपर्कात नाहीत. त्यांच्यासोबत शिवेसेनेचे जवळपास 25 आमदार (Eknath Shinde Not Reachable with 17 MLAs) देखील असल्याची माहिती आहे. हे सर्व आमदार गुजरातच्या सुरत (Surat, Gujarat) शहरातील द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. तसेच ते भाजपच्या संपर्कात आहेत. शिंदेनी पुकारलेल्या या बंडामुळे माहाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. या संदर्भातील सर्व घडामोडींवर या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण नजर ठेवणार आहोत. येथे पुढे जाणून घेऊया या बातमी संदर्भातील सर्व महात्त्वाच्या घडामोडी…
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक- एकनाथ शिंदेंचे ट्वीट
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी काही मिनिटांपूर्वी केले आहे. त्यामुळे ते बॅकफूटवर गेले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”.
एकनाथ शिंदेची शिवसेनेच्या गटनेतेपदावरुन हकालपट्टी
बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिवसेनेचे निष्ठावान असलेले अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फडणवीस सुरतच्या दिशेने
दिल्लीत पोहोचलेले देवेंद्र फडणवीस आता सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत अशी माहिती मिळतेय. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर काही आमदारही सुरतमध्येच एका हॉटेलमध्ये आहे. त्यामुळे आता फडणवीस या आमदारांची भेट घेणार का हे पाहावं लागणार आहे.