ताजी बातमी ऑनलाईन टीम
सरकारी, कार्यालयीन आणि फॅक्टरीत काम करणारे कर्मचारी, कामगार यांच्यासाठी खुषखबर आहे. केंद्र सरकार या कर्मचा-यांना लवकरच सहा दिवसांच्या कामातून मुक्त करणार आहे. त्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनात ही अमुलाग्र बदल करण्याचा निर केंद्राने घेतला आहे. नवीन वेतन संहिता लागू करण्यात येणार आहे.
परिणामी आठवड्यातील कामाचे दिवस त्यांच्या पगाराचे स्वरुप आणि निवृत्ती वेतनासंबंधी (PF) महत्वपूर्ण बदल होतील. या नवीन नियमांनुसार, कर्मचा-यांचा आठवडा चार दिवसांचा असेल. त्यांना तीन दिवस सुट्टी मिळेल. पण कामाचे तास जास्त असतील. सुट्टीचा विचार करता कर्मचा-यांना चार दिवसांतच आठवड्याचे काम करावे लागेल.ही वेतन संहिता एप्रिल महिन्यातच लागू करण्याचा निर्णय होता. परंतू काही राज्य सरकारांच्या असहकार्य धोरणामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात येत असल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे. त्यामुळे पुढील महिन्यांपासून कर्मचा-यांच्या जीवनशैलीत मोठा बदल होईल.
वार्षिक सुट्ट्या वाढणार
या नवीन नियमांचा सर्वाधिक फायदा कामगारांना होणार आहे. त्यांच्या वार्षिक सुट्यांमध्ये आता वाढ होणार आहे. तब्बल 60 जास्तीच्या सुट्या वेतनधारकांना मिळणार आहे. कर्मचा-यांच्या एका वर्षातील रजेची संख्या 240 ऐवजी आता 300 एवढी राहणार आहे. कामगार संहितेच्या नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात कामगार मंत्रालय, कामगार संघटना सह औद्योगिक जगतातील प्रतिनिधींची चर्चा झाली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला होता.