ताजी बातमी ऑनलाईन टीम
चंदीगड : पंजाबमधील ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय पोपली यांचा मुलगा कार्तिक (26) याचा गोळीबारात मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपासातील कामकाज म्हणून पोपली यांच्या घरावर छापा टाकलेला होता. कुटुंबाचे म्हणणे आहे की, कार्तिकवर ‘एसीबी’च्या पोलिसांनी गोळी झाडली. दुसरीकडे कार्तिकने स्वत:च स्वत:वर गोळी झाडल्याचे चंदीगडचे पोलिस अधीक्षक कुलदीप चहल यांचे म्हणणे आहे.
पती अटकेत आणि त्यात एकुलत्या मुलाच्या मृत्यूने खचलेल्या या मातेने जोवर छापा टाकायला आलेल्या प्रत्येक पोलिसाची ‘वर्दी’ उतरवणार नाही, तोवर मुलाच्या रक्ताचे डाग धुणार नाही, असा आक्रोश चालविला आहे. पथकातील अधिकाऱ्यांशी कार्तिकने वाद घातला. कार्तिकवर एकाने पिस्तूल झाडले, असा या मातेचा आरोप आहे.