Monday, November 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर रोड वरील चेतन मोटर पाठीमागील गॅरेज जवळून कार चोरीस:-

कोल्हापूर रोड वरील चेतन मोटर पाठीमागील गॅरेज जवळून कार चोरीस:-

ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर रोड वरील चेतन मोटर पाठीमागील गॅरेज जवळून कार चोरीस गेल्याची फिर्याद सांगली शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी समीर हशमुदिन मुजावर वय 42 वर्षे व्यवसाय व्यापार राहणार आळंदे जिल्हा कोल्हापूर यांची कोल्हापूर रोड वरील चेतन मोटर्स पाठीमागे असलेल्या स्प्रे पेंटिंग गॅरेज जवळील फरदीन मिस्त्री यांच्या गॅरेज मधून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चार लाख रुपये किमतीची राखाडी रंगाची फोर्ड इको स्पोर्ट कंपनीची गाडी नंबर MH 31 FE 0032 ही चोरून नेली आहे.

याबाबत समीर हशमुदिन मुजावर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -