Monday, November 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कंटेनर-दुचाकी अपघातात डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कंटेनर-दुचाकी अपघातात डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महागाव; गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील हुनगीनहाळजवळ झालेल्या मोटार सायकल व कंटेनर अपघातात मुत्नाळ (ता.गडहिंग्लज) येथील डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. उमा मार्तंड जरळी (वय २५) असे मृत तरूणीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे.


घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, डॉ. उमा जरळी ही महागाव येथील हस्पिटलमध्ये सेवा बजावत होती. आज सकाळी उमा जरळीहून महागावकडे कामावर जात होती. हुनगीनहाळ गावाजवळील चोथे वसाहत येथील वळणावर आले असता कंटेनर व मोपेडची धडक झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या उमा यांचा जागीच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -