Friday, July 25, 2025
Homeनोकरीबँक ऑफ बडोदामध्ये 325 पदांसाठी भरती, 89 हजार मिळेल पगार!

बँक ऑफ बडोदामध्ये 325 पदांसाठी भरती, 89 हजार मिळेल पगार!

बँकेमध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची इच्छा असणाऱ्या आणि नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2022) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट विभागासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवारांना रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट, क्रेडिट एनालिस्ट कॉर्पोरेट म्हणून नियुक्त केले जाणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या या भरती (BOB Recruitment 2022 ) प्रक्रियेअंतर्गत एकूण 325 पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 जून 2022 पासून सुरु झाली आहे. तर 12 जुलै 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 22 जून 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 12 जुलै 2022

रिक्त पदांचा तपशील

रिलेशनशिप मॅनेजर – 75 पदं
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट – 100 पदं
क्रेडिट एनालिस्ट – 100 पदं
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट – 50 पदं

शैक्षणिक पात्रता

रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

क्रेडिट एनालिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे फायनान्स विषयातील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.

पगार

रिलेशनशिप मॅनेजर – दरमहा 89,890 रुपये
क्रेडिट एनालिस्ट – दरमहा 78,230 रुपये
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट – दरमहा 78,230 रुपये
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट – दरमहा 69,180 रुपये

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -