कोविड-19 च्या संकटात (Covid Pandemic) एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सचे mRNA कोविड-19 (Covid Vaccine) लसीचे दोन डोस मंजूर केले आहेत. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय असून ही लस 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, DCGI ने सीरम इन्स्टिट्यूटच्या (Serum Institute) लसला 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींसह मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूर केले आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत विषय तज्ज्ञ समितीने (SEC) भारतातील पहिल्या m-RNA लसीच्या आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली होती. या लस संदर्भात जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीने एप्रिलमध्ये डेटा सादर केला. त्यानंतर त्यांनी मे महिन्यात पुन्हा अतिरिक्त डेटा सादर केला. भारताच्या औषध नियामक अंतर्गत विषय तज्ञ समितीने जेनोव्हा बायोफा्मास्युटिकल्सने सादर केलेला डेटा समाधानकारक असल्याचे नमूद केल्याने ही मंजुरी दिली आहे. मे महिन्यात m-RNA लसीच्या 4000 जणांवर चाचण्या घेण्यास सुरुवात झाली होती. त्या अनुषंगाने जेनोव्हाने फैज-3 डेटा सबमिशन संदर्भात एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये असे लिहिले होते की, “जेनोव्हा नियामक एजन्सीशी संवाद साधत आहे आणि उत्पादन मंजूरीसाठी आवश्यक असलेला सर्व डेटा आणि माहिती सबमिट केली आहे. कंपनीने लस सुरक्षितता, प्रतिकारशक्ती आणि सहनशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी 4000 सहभागींवर फेज-2 आणि फेज-3 चाचण्या घेतल्या आहेत. ही लस 2 ते 8 अंश तापमानात साठवली जाऊ शकते.
रिपोर्टनुसार DCG। ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अँटी-C0VID-19 लस कोवोव्हक्सला 7 वर्षे ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींच्या अधीन राहून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. कोविड विषय तज्ज्ञ समितीने (SEC) शिफारस केल्यानंतर लसला परवानगी मिळाली आहे. 16 मार्च रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SI) संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी या संदर्भात DCG। ला एक विनंती पत्र दिले होते.
दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिम गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी सुरू झाली होती. कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि त्याची व्याप्ती देशभर विस्तारण्यासाठी केंद्र सरकार लसीकरणमोहिमेअंतर्गत मोफत कोविड-19 लस उपलब्ध करून देत आहे.