न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारी पहिली ODI रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमदने म्हटले की, हा एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असून त्यामुळेच दौरा रद्द करण्यात आला आहे.
रावळपिंडीमध्ये हाय वोल्टेज ड्रामा
रावळपिडींमध्ये न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान दरम्यान पहिला एकदिवसीय सामना सुरू होणार होता. वेळ झाल्यानंतरही हा सामना सुरू झाला नाही. दोन्ही टीम आपआपल्या हॉटेलच्या बंद खोल्यामध्ये होत्या. यानंतर न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेविड वाइटने म्हटले की, आम्हाला मिळालेल्या सूचनेमुळे आम्ही दौरा रद्द करीत आहोत.
इस्लामाबादमध्ये एका संमेलनात रशीद अहमदने म्हटले की, हा कट करणाऱ्यांचे नाव घेणार नाही. अफगानिस्तानमध्ये जे काही सुरू आहे.त्यानंतर काही घटक पाकिस्तानला बळीचा बकरा बनवू इच्छिता. जिओ टीव्हीच्या रिपोर्टनुसार किवी टीम द्वारा पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याच्या काही तासानंतर अहमदने म्हटले की, न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांकडे पाकिस्तानमधील धोक्याचे ठोस पूरावे नाहीत.
न्यूझीलंडचा एकतर्फी निर्णय
रशीद अहमदने म्हटले की, न्यूझीलंडच्या टीमसाठी देशात पूर्णतः सुरक्षा तयारी केल्यानंतरही न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्हटले की, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडचा दौरा रद्द झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट; आंतरराष्ट्रीय कट असल्याचा लावला आरोप
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -