Monday, March 4, 2024
Homenewsराज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा


राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.


राज्यात पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.


राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी चांगले ऊन पडलेले दिसून येत आहे. उद्या रविवारपासून पुन्हा चांगला ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आकाश स्वच्छ दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -