Sunday, December 22, 2024
HomenewsIT कंपन्यांचा कर्मचारी भरतीचा धडाका...120 टक्के पगार वाढ

IT कंपन्यांचा कर्मचारी भरतीचा धडाका…120 टक्के पगार वाढ


कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली नाही. तर अनेकांच्या पगारात कपात करण्यात आली. अशात भारतीय कर्मचाऱ्यांसाठी आता चांगली बातमी आहे. भारतात आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल कर्मचाऱ्यांच्यात मागणी वाढली असून त्याच्या वेतनात 70-120 टक्के पगार वाढ करण्यात येणार आहे.


कोरोना महामारीचा भारतात जॉबवर कसा परिणाम झाला याचा इनडीपने अभ्यास केला आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार कोरोना काळात आयटी कर्मचाऱ्यांची संख्या 400 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, या वर्षात आयटी सेक्टर्समधील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. टीसीएस, इंफोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले आहेत.


माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएसने काही दिवसांपूर्वीच महिलांसाठीच्या एका मोठ्या भरतीची घोषणा केली होती. या भरतीमध्ये ज्या महिलांनी करिअर गॅप घेतला आहे, अशांना संधी देण्यात येणार होती. करिअर गॅपनंतर देखील महिलांमधील टॅलेंट कायम असते. त्यांना गरज असते ती एका संधीची. टीसीएस, इन्फोसिस,विप्रो आणि इतर मोठ्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. याचा अर्थ असा होतो की, आयटी सेक्टने कर्मचाऱ्यांच्या वेतनात करण्यात येणाऱ्या खर्चामध्ये 1.6-1.7 डॉलर बिलीयनने वाढ केली आहे. ही नोकरी शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बंगळूरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे या ठिकाणी आयटी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला देखील अधिक होणार आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जगात ‘घरातून काम करण्याचा’ ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे आता कर्मचार्यांवर होणाऱ्या खर्चात कपात झाली आहे. भारतीय कंपन्यांसह जगातील सर्व मोठ्या कंपन्या पूर्वीच्या तुलनेत ऑपरेशनल आघाडीवर कमी खर्च करीत आहेत. कर्मचार्यांना अन्न, मनोरंजन आणि सोई पुरवण्यासाठी बरेच पैसे खर्च केले जातात. पण, आता घरातून काम असल्यामुळे हे भत्ते आता कर्मचार्यांना दिले जात नाहीत. त्यामुळे कंपनीकडे बरेच पैसे शिल्लक आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांना फायदा झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -