Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रइथेनॉल निर्मितीसाठी गुराळघरांना परवानगी देण्याची ‘स्वाभिमानी'ची मागणी

इथेनॉल निर्मितीसाठी गुराळघरांना परवानगी देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इथेनॉल निर्मिती ही गुहाळघरांसाठी नवसंजिवनी ठरू शकते त्यामुळे गुन्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.


राज्यातील साखर कराखान्यांची गाळप क्षमता वाढवली आहे. त्यांना मिळालेल्या या परवानगीमुळे गुराळघरांवर परिणाम होऊन त्यांचं अर्थकारण बिघडण्याची शक्यता आहे. त्यातच साखर कारखानदार एकत्रित येवून गुहाळघरांना एफआरपीच्या कायद्यात अडकवू पाहत आहेत. यामुळे गाळप परवाना आणि साखर आयुक्तालयाच्या परवानग्या यामध्ये पिचला जाऊन त्यांच्यावर अर्थिक अरिष्ट येऊ शकते. वाढत्या ऊत्पादन खर्चामुळे बरिच गुन्हाळघरे बंद पडली आहेत. त्यामुळे अशा अर्थिक चक्रात सापडलेल्या गुन्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी. अशी मागणी राजू शेट्टी आपल्या निवेदनात केली आहे.
गुहाळघरांनी एकत्र येऊन इथेनॉल प्रकल्प उभा केल्यास किंवा गुन्हाळघरांमध्ये इथेनॉल निर्मिती केल्यास उसउत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तसे धोरण तयार करण्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री गडकरी यांच्याकडे केले. साखर कारखान्यांच्याही पुर्वी गुहाळघरांनी शेतकऱ्याना अर्थिक स्थिरता दिली आहे. पण आता डबघाईला आलेल्या उद्योगाला नवसंजिवनी देण्यासाठी इथेनॉल सारख्या प्रकल्पाची गरड असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -