Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगमहाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त ठरला ! देवेंद्र फडणवीस 1 जुलैला मुख्यमंत्रिपदाची...

महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त ठरला ! देवेंद्र फडणवीस 1 जुलैला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशा सत्तासंघर्षाचा आठवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी रात्री उशीरा भेट घेवून बहुमताचा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे फ्लोर टेस्टची मागणी केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे.



उद्धव ठाकरे सरकारचे मंत्री आणि शिवसेना तसेच अपक्ष आमदारांनी गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे पण ते आपल्या अटींवर ठाम आहेत. सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यांच्यावर सुरुच आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -