Tuesday, August 26, 2025
Homeसांगलीमिरज :खंडेराजुरीत कुटुंबाला काठीने बेदम मारहण

मिरज :खंडेराजुरीत कुटुंबाला काठीने बेदम मारहण

खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शेत जमिनीच्या कारणातून कुटुंबास काठीने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजाराम रामचंद्र शाळगावकर यांनी अर्जुन शिवाजी रुपनर, करण अनिल रुपनर (दोघे रा. खंडेराजुरी, ता. मिरज) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजाराम शाळगावकर हे शेतातील काम आटोपून पत्नी व मुलासमवेत घरी परतत होते. त्यावेळी अर्जुन आणि करण राजाराम यांना “तुला बघतोच” असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काठी ओढून घेत असताना राजाराम यांच्या हाताला जखम झाली. त्यानंतर दोघांनी राजाराम यांचा मुलगा आणि पत्नीला देखील काठीने मारहाण केल्याचे राजाराम शाळगावकर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -