Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रवडिलांनी दुसरं लग्न केल्याचा राग, मुलाने केली सावत्र आईची निर्घृण हत्या

वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा राग, मुलाने केली सावत्र आईची निर्घृण हत्या

पुण्यात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खून, हत्या,अपहरणाच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. पुण्यातल्या (Pune News) भोरमधील धन्वंतरी प्लाझा या इमारतीतील धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी दुसरा लग्न केल्याचा राग मनाशी बाळगून मुलाने सावत्र आईचा निर्घृण खून (Pune Crime) केल्याची घडली आहे. 22 वर्षांच्या मुलाने सावत्र आईचा आधी गळ चिरला त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगडी वरंवटा घालून तिची निर्घृण हत्या (Son Killed Step Mother) केली. या घटनेमुळे पुण्यात (Pune City) खळबळ उडाली आहे.

झोपेत केला गळ्यावर वार
शिवम शिंदे असं आरोपी मुलाचं नाव असून तो 22 वर्षाचा आहे. सध्या तो कामानिमित्त कात्रज येथे राहत आहे. मात्र गुन्हा घडला त्या दिवशी तो वडिलांच्या घरी भोर येथे आला होता. वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यामळे त्याचं सावत्र आईशी कधीच जमत नव्हतं. वडील रात्रपाळीला कामावर गेल्याची संधी साधत शिवमने पहाटे सावत्र आई रेश्मा अंकुश शिंदे हिच्या गळ्यावर झोपेत असताना धारधार शस्त्राने वार केले. यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. तर त्याने घरातला दगडी वरंवटा सावत्र आई रेश्मा शिंदे हिच्या डोक्यात घातला. हत्या केल्यानंतर शिवम तिथून फरार झाला.

आई गेल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा राग गेल्या काही दिवसांपासून शिवमच्या मनात राग होता. या रागातून त्याने आपल्या सावत्र आईची निर्घृण हत्या केली. हत्या झाली त्यावेळेस रेश्मा यांच्या दोन मुली घरातच होत्या, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शिवमने तिथून पळ काढला. या घटनेबाबत मयत रेश्मा यांची मुलगी क्षितिजा (वय 18 ) हिच्या फिर्यादीवरून भोर पोलीस स्टेशनला (Bhor Police Station) शिवम शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस (Pune Police) करत आहे. दरम्यान, पहाटेचा झालेल्या खुनाच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -