ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office)धुमाकूळ घातला होता. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाला केवळ दाक्षिणेतच नाही तर हिंदी पट्ट्यातही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातील गाणी आणि संवादांनीही प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. परिणामी हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की प्रेक्षक आता त्याच्या दुसऱ्या भाग ‘पुष्पा २: द रुल’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा २’ ची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. पुष्पाचा दुसरा भाग कधी येणार? अल्लू अर्जुनच्या या सिनेमाचं शूट ऑगस्टपर्यंत सुरू होईल. यात अनेक अॅक्शन सीक्वेन्स शूट केले जातील. एवढंच नाही तर हे अॅक्शन सीन्स भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या सीन्सपैकी एक असतील. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनचं काम केलं जाईल. म्हणजेच हा चित्रपट आता २०२३ च्या मध्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.
Pushpa 2- संपली प्रतीक्षा! मेगास्टारचीही सिनेमात नवी एण्ट्री
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -