Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगPM Modi : लघू, मध्यम उद्योगांसाठी पंतप्रधानांकडून नवीन योजना जाहीर

PM Modi : लघू, मध्यम उद्योगांसाठी पंतप्रधानांकडून नवीन योजना जाहीर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नवी दिल्ली; लघू आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अनेक योजनांचा शुभारंभ केला. याप्रसंगी एमएसएमई क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कारदेखील करण्यात आला.



देशाची निर्यात वाढावी तसेच नवनवीन उत्पादने बाजारात पोहोचावीत, याकरिता एमएसएमई क्षेत्र मजबूत होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी बोलताना केले. या क्षेत्रात असलेल्या अमर्याद संधी पाहूनच सरकारने धाडसी निर्णय घेत आहे. नवीन योजना आखत आहे. अलिकडील काळात फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील गॅरंटीशिवाय कर्ज मिळत आहे. केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत एमएसएमई क्षेत्राच्या अर्थसंकल्पात ६५० टक्क्याने वाढ केलेली आहे, असे मोदी यांनी नमूद केले.



देशावर ज्यावेळी कोरोनाचे संकट आले होते, त्यावेळी देखील सरकारने लघू व मध्यम उद्योजकांची साथ सोडली नाही, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने इमरजन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेअंतर्गत कोरोना काळात एमएसएमई क्षेत्रासाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची मदत केलेली आहे. पहिल्यांदा निर्यात करणाऱ्या उद्योजकांसाठी सीबीएफटीई ही योजना चालू केली जात आहे. तर एमएमएमई उद्योगांची कामगिरी सुधारण्यासाठी आरएएमपी आणि पंतप्रधान रोजगार वृध्दी कार्यक्रम सुरु केला जात आहे. मोदी यांच्या हस्ते यावेळी पीएमईजीपी योजनेच्या १८ हजार लाभार्थ्यांना डिजिटल माध्यमातून पाचशे कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -