ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा आज जयंती दिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (दि. १) व्यक्त केला. ते पणजी येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते (Eknath Shinde) म्हणाले की, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व भरभराटीसाठी हे सरकार कटिबद्ध आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये, म्हणून सरकारच्या वतीने उपाययोजना करण्यात येतील. राज्यातील जलयुक्त शिवार योजना, मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. राज्यातील
रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. जलसिंचनाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवला जाईल, असेही ते म्हणाले.