ताजी बातमी ऑनलाईन टीम
पक्षांतर्गंत बंडाळी झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आजच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. ही सुनावणी 11 जुलैलाच होईल, असे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही. सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची गुरुवारी शपथ घेतली. मात्र, या सरकारविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित असताना नव्या सरकारची बहुमत चाचणी न घेण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. त्याचबरोबर नव्या याचिकेत 39 बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला. या याचिकेवर 11 जुलैलाच सुनावणी होईल, असे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.
मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, सुप्रीम कोर्टाचा तातडीने सुनावणीस नकार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -