Tuesday, August 5, 2025
Homeब्रेकिंगशहनाजचा मोठा खुलासा, म्हणून घेतली सलमानची गळाभेट

शहनाजचा मोठा खुलासा, म्हणून घेतली सलमानची गळाभेट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बिग बॉस फेम फेम शहनाज गिलने ( Shehnaaz Kaur Gill ) नुकताच एका मुलाखतीत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरे दिली आहेत. खरंतर शहनाज गिल यावर्षी अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी जेव्हा सलमान खानला हाताला धरून शहनाज आपल्या गाडीजवळ घेऊन आली. त्याआधी शहनाजने दबंग खानची गळाभेट घेतली होती. सलमान आणि शहनाजचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. आता तिने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला की, मी सलमानला हग केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं.



शहनाज गिल ( Shehnaaz Kaur Gill ) आणि सलमान खानचा ईद पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ पाहून अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हटलं गेलं होतं. तर सिद्धार्थच्या चाहत्यांनी शहनाजवर अनेक प्रश्नाचा भडीमार करत तिला ट्रोलदेखील केले होतं. या घटनेला काही महिने उलटले आहेत. यानंतर शहनाजने या प्रकरणावर सध्या
सडेतोड उत्तर दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -