ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे आता या पक्षाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. ‘शिंदेशाही’ सुरू झाल्यानंतर यातील काही आमदार या गटाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संख्याबळ नसतानाही विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते पद देण्याची पद्धत विधानसभेमध्ये अंगीकारली जाणार नाही. विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजप आता सत्तेत गेला असल्यामुळे विरोधकांमध्ये आमदारांची संख्या असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची नावे चर्चेत
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -




