Tuesday, December 24, 2024
Homeसांगलीसांगली : नारळ सोलण्याचे मशीन डोक्यात घालून भावाचा केला खून

सांगली : नारळ सोलण्याचे मशीन डोक्यात घालून भावाचा केला खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विटा : दारू पिऊन शिव्या देतो, म्हणून भावानेच भावाचा नारळ सोलण्याचे लोखंडी मशीन डोक्यात घालून खून केल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी विनोद अर्जुन पवार (वय
२४, रा.बलवडी (भा), ता. खानापूर) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे. तर वैभव अर्जुन पवार (वय ३८) असे मृताचे नाव आहे. याबाबत या दोघांची आई अलका अर्जुन पवार यांनी फिर्याद दिली आहे.



याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, अलका पवार या बलवडी (भा) गावी वेताळबा वस्तीवर राहतात. गुरूवारी (दि. ३० जून) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या घरासमोर विनोद आणि वैभव पवार या भावांमध्ये मोठी वादावादी झाली. त्यावेळी वैभव हा दारू प्यायला होता. त्यानंतर काही वेळात वैभव यास चक्कर आली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्यावर भाऊ विनोदने तात्काळ वैभव यास सांगलीच्या शासकीय रुग्णालयात येथे उपचारासाठी नेले. परंतु, तो पर्यंत वैभवचा मृत्यू झाला होता. डोक्यातून प्रचंड रक्त स्त्राव झाल्याने वैभव याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, याबाबत शंका आल्याने आई अलका पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -