जून महिन्यात चातकासारखी वाट पहायला लावलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पुढील ५ दिवसात मुसळधार पावसाचा(rain) चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा(rain) अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मराठवाड्यासह काही भागासह विदर्भातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. काल मुंबईमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी, तर भायखळा आणि कुलाब्यात २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. २०४ मिमीहून अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी म्हटले जाते. कालपासूनच मुंबईत | मुसळधार पाऊस सुरु आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा(rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीसह पुने, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची दमदार एन्ट्री मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात कोकणात, सांगली, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पण पुण्यात अद्यापही मनासारखा पाऊस झाला नाही. काल हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.