पावसाळ्यात पावसाबरोबरच अनेक आजारांचेही आगमन होते..संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी आजारापासून बचाव करण्यासाठी रोजच्या आहारात काही बदल करणं गरजेचं असतं.. विशेषत: या काळात अनेक जण मांसाहार टाळण्याचाच सल्ला देत असतात..
श्रावण महिना सुरु झाला, की अनेक जण पूजा-उपासनेच्या धार्मिक कारणांमुळे मांसाहार करणं बंद करतात. मात्र, त्यामागेही वैज्ञानिक कारणेही आहेत. पावसाळ्यात ‘नाॅन व्हेज’ का करु नये, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
मांसाहार का टाळावा..?
प्रदूषित मासे
आरोग्यासाठी मासे खाणे चांगले असते.. पण पावसाळ्यात मासे खाणं टाळा. पावसामुळे सारी घाण तलावात, समुद्रात वाहून जाते. ही घाण माशांच्या खाण्यात येते.. त्यामुळे असे मासे खाण्यात आल्यास, तुम्ही आजारी पडू शकता.
कमकुवत पचनशक्ती
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे पचनशक्ती कमी होते. मांसाहारी पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. पचनशक्ती कमकुवत असल्यास, मांस आतड्यांमध्ये सडू लागते.. त्यातून विषबाधा होण्याचा धोकाही असतो.
बुरशीचा धोका
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हवेतील आर्द्रता वाढते, त्यामुळे बुरशीचा धोका व बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात थेट सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने अन्नपदार्थही अधिक वेगाने सडू लागतात.
आजारी जनावरे
पावसाळ्यात कीटकांची संख्या वाढलेली असते.. डासांचे प्रमाण वाढलेले असते.. त्यामुळे जनावरेही आजारी पडतात.. अशा प्राण्यांचे मांस खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचू शकते.