Monday, February 24, 2025
Homeसांगलीम्हैसाळ हत्या प्रकरण : मांत्रिक अब्बास बागवानच्या घरातून काळ्या जादूचे साहित्य हस्तगत

म्हैसाळ हत्या प्रकरण : मांत्रिक अब्बास बागवानच्या घरातून काळ्या जादूचे साहित्य हस्तगत

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येत अटक असलेल्या मांत्रिक अब्बास बागवान याच्या घराची झडती सांगली पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर घेतली. सोलापुरातील मुस्लिम पाच्छा पेठ येथील अपार्टमेंटमधील त्याच्या घरी काळ्या जादूचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत केले असून तपासासाठी सांगली येथे घेऊन गेले आहेत.
गुप्तधनाचे आमिष दाखवून म्हैसाळ (सांगली-मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील 9 जणांची हत्या केली. याप्रकरणी अब्बास बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवसे यांच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच दोघा संशयीत आरोपींना 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अब्बास बागवान अघोरी विद्येत होता पारंगत

अब्बास महंमदअली बागवान हा अघोरी विद्यात पारंगत होता. ही अघोरी विद्या यशस्वी होण्यासाठी तो अघोरी कृत्ये करत असल्याची माहिती त्याच्या घराशेजारी असलेल्या नागरिकांनी दिली. दर अमावस्या, पौर्णिमेला अब्बास बागवान अघोरी कृत्ये करत होता. याबाबत त्याच्या घरातील इतर सदस्यांना देखील माहिती होती. तसेच सोलापुरातील त्याच्या नातेवाईकांनादेखील अघोरी कृत्यांबद्दल माहिती होती. मंत्र तंत्र पठण करत स्वतःचे विष्टान्न खाणे इतर पुरुषांसोबत अनैसर्गिक संभोग करणे, इतर पुरुषांचे वीर्य प्राशन करणे असे अनेक घाणेरडे कृत्य करत अघोरी विद्या करत असल्याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी दिली.

सोलापुरातही गुप्तधनाचे आमिष

गुप्तधन काढून देतो, कोट्यवधी रुपयांचे गुप्तधन तुमच्या घराच्या जमिनीखाली आहे. त्यासाठी मंत्रतंत्र विद्येच्या सहाय्याने ते काढावे लागेल असे आमिष दाखवुन त्याने सोलापुरातील नागरिकांना फसविले आहे. यापैकी काही घटनांची पोलीस ठाण्यात नोंद आहे. 2009 साली सोलापुर शहरातील विजापूरवेस येथील एका प्रसिद्ध व्यवसायिकाला फसविले. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे जेलरोड पोलीस ठाण्यात त्याविरोधात नोंद आहेत. पण अनेकवेळा पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्ततादेखील झाली आहे.

काळी जादू करण्याचे साहित्य पोलिसांकडून जप्त

सांगली पोलिसांची टीम शुक्रवारी दिवसभर सोलापुरात तळ ठोकून त्याच्या घराची झडती घेतली. मुळेगाव रोड वरील सरवदे नगर येथील घर, बाशा पेठ येथील अपार्टमेंट येथील फ्लॅट या घरांची झडती घेण्यात आली. त्याठिकाणी पोलिसांना काळी जादू करण्याचे साहित्य, जडीबुटी सारखे अनेक औषध वनस्पती, लाकडी दांडके आदी साहित्य सांगली पोलिसांनी हस्तगत केले आहे. अटक झाल्यापासून त्याची पत्नी व मुले फरार आहेत. अब्बास बागवान हा काही मोजक्या लोकांच्या संपर्कात होता. शुक्रवारी सांगली पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर हे आपल्या टीम सोबत सोलापुरात आले होते. रात्री उशिरापर्यंत मांत्रिक अब्बास बागवान याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले. आणि सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाणे येथे माहिती देऊन रात्रीच सांगलीच्या दिशेने अब्बासला घेऊन रवाना झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -