Saturday, February 21, 2026
Homeमनोरंजनपैसे कमावण्यासाठी आता Priyanka Chopra विकतेय ऑनलाईन भांडी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

पैसे कमावण्यासाठी आता Priyanka Chopra विकतेय ऑनलाईन भांडी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

बॉलिवूडची  देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा  ही ग्लोबल स्टार झाली आहे. बॉलिवूडपासून (Bollywood) ते हॉलिवूडपर्यंत (Hollywood) प्रवास करणाऱ्या प्रियंका चोप्राचे आज जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. निक जोनाससोबत लग्न केल्यापासून प्रियंका भारताबाहेरच राहत आहे. प्रियंकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण सध्या प्रियांका चोप्राला फक्त अभिनयापुरते मर्यादित राहिलेली नाही. तिने तिची काही रेस्टॉरंट्सही उघडली आहेत. ज्यांचे नाव ‘सोना’ आहे. पण आता प्रियांकाने आणखी एक काम (Priyanka Chopra Homeware ) सुरू केले आहे. ज्यासाठी तिला सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच ट्रोल (Priyanka Chopra Trolled) केले जात आहे.

अलीकडेच प्रियंका चोप्राने सोना होम (Sona Home) नावाने तिची नवीन भारतीय होमवेअर लाइनअप वेबसाईट लॉन्च केली. प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट करत या पोस्टला हृदयस्पर्शी कॅप्शन दिले आहे. हा ब्रँड तिला तिच्या दुसरे घर असलेल्या अमेरिकेत पुन्हा एकदा ‘भारताचा एक तुकडा’ आणण्यात कशी मदत करेल, असे लिहिले आहे. मात्र, प्रियंकाचा हा ब्रँड लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये सोना होमला त्याच्या महागड्या उत्पादनांमुळे खूप ट्रोल केले जात आहे.

सोना होम ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एका टेबल क्लॉथची किंमत 30,612 रुपये आहे. चार डिनर नॅपकिनच्या सेटची किंमत 13,284 रुपये आहे. एका डिनर प्लेटची किंमत 4,733 रुपये, सर्व्हिंग बाऊलची किंमत 7,732 रुपये, चहाचा कप आणि बशीची किंमत 5,365 रुपये आणि एक मग 3,471 रुपये आहे. प्रियांका चोप्राच्या या कलेक्शनची किंमत ऐकून लोकं हैराण झाले आहेत. काही लोकांनी सोशल मीडियावर अभिनेत्रीची खिल्लीही उडवली.

दरम्यान, प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, प्रियंकाने नुकतेच रुसो अभिनीत तिच्या पहिल्या वेब सीरिज ‘सिटाडेल’चे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय तिच्याकडे ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ हा चित्रपटही आहे. प्रियंका शेवटी ‘द व्हाइट टायगर’मध्ये दिसली होती. प्रियांकाकडे आता कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’ हा चित्रपट सुद्धा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -