Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा मोठा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा मोठा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे

 

या सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.मात्र त्यानंतर सहा तारखेपासून राज्यातील पावसाचं प्रमाणा कमी होईल, साधारण पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ एस. डी सानप यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे

 

मराठवाडा आणि विदर्भात गेले काही दिवस चांगला पाऊस झाल्याने जून महिन्यात पावसाची जी तूट झाली होती, ती काही प्रमाणात भरून निघाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -