सोशल मीडियाचा वाढत्या वापरामुळे क्राईमचा रेट वाढतो आहे. समाजातील वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेर धक्कादायक घटना घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी फेसबुकवर (Facebook ) खूप वेळ चॅटिंग करते, या शंकेतून पतीने गळा आवळून तिची हत्या केली.
ही धक्कादायक घटना हुगळी जिल्ह्यातील चंदननगर येथे घडली आहे. फेसबुकच्या माध्यमातून अन्य पुरुषांसोबत पत्नी चॅट करते आणि इतर पुरुषांना मित्र करवून घेते, अशी पतीला शंका होती. चॅट करू नको, असं वारंवार सांगूनही पत्नी चॅट करतच होती. त्यातून त्यांची भांडणं झाली. भांडणं इतकी टोकाला गेली की, पत्नीची गळा आवळून हत्या केली.
रिंटू दास असं या पतीचं नाव आहे. तर, पल्लवी दास मृत पत्नीचं नाव आहे. पल्लली वारंवार फेसबुक चॅटिंगमध्ये एंगेज राहत होती. रिंटूला शंका आली की, पल्लवी फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून इतर पुरुषांशी फेसबुक फ्रेंड होऊन त्यांच्याशी चॅट करत आहे. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर शंका येत होती.
१९ सप्टेंबरला रात्री रिंटूने पत्नी पल्लवीचा गळा आवळून हत्या केली. आरोपी रिंटू दासला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केलेली आहे. रिंटू आई मना दास यांनी सांगितलं की, “पल्लवीला फेसबुक चॅट करण्याची सवय होती. तिच्या पतीला हे आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वादविवाद होत असत. रिंटू या प्रकरावरून मारहाणही करत होता.”
Facebook चॅटिंगच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -